Posted on February 23, 2022
मागील ब्लॉग मध्ये आपण पंचकर्म, त्याचे प्रकार आणि वमन, विरेचन या कर्माबद्दल माहिती घेतली. आणि आजच्या ब्लॉग मध्ये आपण बस्ती चिकित्सा बद्दल माहिती घेणार आहोत.
बस्ती चिकित्सा म्हणजे काय ?
बस्ती चिकित्सा म्हणजे सामान्यपणे एनीमा म्हणजे पोट साफ करणारे औषध असं मानलं जात कारण पोट साफ झालं की बरं वाटतं.
पण तसे नाही आहे .
बस्ती चिकित्सेमागे खूप महत्वपूर्ण शास्त्रीय विचार आहे.
आयुर्वेदाने बस्ती चिकित्सेला “अर्धी चिकित्सा” मानली आहे. म्हणजे एखाद्या रुग्णाला बरं करण्यासाठी बस्ती चिकित्सा दिली तर ५० टक्के गुण फक्त बस्ती चिकित्सेने मिळतो आणि उरलेल्या ५० टक्के गुणासाठी इतर पंचकर्म, औषध, आहार, व्यायाम यांची योजना करावी लागते.
जर आयुर्वेदाने बस्ती चिकित्सेला इतके महत्व दिले आहे तर त्यामागील शास्त्रीय विचार अत्यंत महत्वपूर्ण असणार.
चला तर मग जाणून घेऊया बस्ती कर्मामागील शास्त्रीय विचार.
त्यासाठी पहिले आपल्याला आपल्या पचन संस्थेबद्दल थोडीशी माहिती करून घ्यावी लागणार. आहे.
आपण जे अन्न खातो त्याचे पचन तोंडात सुरू होते. त्यानंतर ते अन्न खाली पोटात म्हणजे Stomach आणि जठर म्हणजे Liver कडे जाते , या अवयवांमधून विविध स्त्राव अन्नात मिसळले जातात आणि जेव्हा ते अन्न आतड्यामध्ये जाते तेव्हा त्यातून पोषक अंश रक्तात शोषून घेतले जातात आणि मग ते पोषक अंश रक्ताद्वारे पूर्ण शरीरात जाऊन शरीराला पोषण देतात.
तर इथे महत्वाची गोष्ट लक्षात ठेवण्याची ही आहे की रक्तात जो पोषक अंश आतड्या मधून शोषला जातो . ह्याच ज्ञानाचा आयुर्वेदाने सुंदररित्या बस्ती चिकित्सेत उपयोग केलेला आहे. त्या ऋषींना शतश: नमन.
औषध रक्तात लगेच शोषले गेले पाहिजे.औषधाला अन्न मार्गातून जाण्याची काही आवश्यकता नसते, तीन तासांचा वेळ वाचतो. त्यामुळे आयुर्वेदात बस्ती चिकित्सेद्वारे औषध, काढे, तूप हे आतड्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोडली जातात. आतड्याचे काम आहे औषध लगेच रक्तात शोषून घेणे आणि त्यामुळे सेकंदात औषध रक्तात जाऊन त्याचे काम सुरू करते .तर बस्ती म्हणजे फक्त पोट साफ करणारे औषध नाही, तर
बस्ती म्हणजे आत्यायिक चिकित्सा.
म्हणजे बस्ती चिकित्सा ही जुन्या काळाची Emergency Services म्हणजे अत्यायिक चिकित्सा होती असे आपण म्हणू शकतो. से आज काल आपण नसेमधून मधून रक्तात लगेच औषध सोडतो तसं त्या काळी बस्ती चिकित्सेद्वारे औषध आतडयात सोडून सेकंदात ते रक्तात शोषले जात असे.
बस्ती चिकित्सा म्हणजे Emergency Services.
आश्चर्यचकित झाला ना .. जाणून.. कि बस्ती चिकित्सेमागे आयुर्वेदाचा इतका मोठा गहण विचार आहे.
आयुर्वेद हे एक शास्त्र आहे हे लक्षात घ्या , आपल्या बुद्धीला त्याच्या मागचे शास्त्र , सिद्धांत समजत नसतील तर त्याला नावे ठेवू नका किंवा ते चुकीच आहे असे मानू नका. त्याच्यापेक्षा त्याच्या मागे काय शास्त्रीय विचार असेल ह्याच अभ्यास करून शोध घ्या .
आपल्या आयुर्वेद शास्त्राबद्दल आदर बाळगा. कारण
आयुर्वेदिक शास्त्राचा प्रत्येक सिद्धांत = सिद्ध + अंत म्हणजे ते सत्य आहे आणि ते सत्य सिद्ध केलेले आहे आणि त्याच्या पुढे सिद्ध करण्यासाठी काही उरले नाही …..अंत आहे. त्याच्यापुढे त्याच्यात बदल नाही ह्याला सिद्धांत म्हणतात.
हा ब्लॉग जास्तीत जास्त फॉरवर्ड करा म्हणजे आयुर्वेदाच्या मागचे सिद्धांत लोकांना कळतील. हा ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करा, तुमचे कमेंट कळवा आणि पुढील ब्लॉग मध्ये आपण बस्तीचीचे विविध प्रकार त्याचे उपयोग यांच्याबद्दल माहिती करून घेऊया.
Stay Healthy ,Stay blessed.
Category: Marathi Blog, Panchakarama Tagged: Aarogyam, Aarogyam Ayurvedic Clinic, acidity, Ayurvda, एसिडिटी, त्यौहार, त्वचा रोग, धन्वंतरी, नस्य, निरोगी, पंचकर्म, प्रकृति, बस्ती, माइग्रेन, रकतमोक्षण, वमन, विरेचन, वैद्य, शरीर शुद्धि, शास्त्र, शिरोधारा, सिद्धांत, Basti, body detoxification, Body Purification, DIET, doctor, festival, health, Health Mantra, Health Tips, Healthy Food, Healthy Living, Healthy Routine, HOW TO, immunity, Immunity Booster, Liver, Nasya, panchakarma, Raktmokshan, routine, season, shirodhara, Stomach, summer, tips, Treasures of Ayurveda, Vaman, Virechan